प्रश्नांतील गुंता वाढतो
अमरावती जिल्ह्यातील कातपूर गावच्या पाचेक हजार शेतकऱ्यांनी यापुढे बीटी कापूस न घेण्याचा निर्णय घेतला आहे. काही जण सोयाबीनकडे वळत आहेत, तर काही थोडे सेंद्रिय शेती करू पाहत आहेत. चार वर्षांपूर्वी बीटी कापसाने चमत्कार होईल, व उत्पन्न कैक पटींनी वाढेल, असे दावे केले गेले. हे नवे बियाणे कीटकनाशकांची गरज कमी करेल, हा मुख्य मुद्दा ठसवला गेला. …